पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

पिएमपीएमएल बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात, प्रवासी जखमी….

नादुरुस्त बस बदलण्याची प्रवाशांची मागणी

राहु (टिम – बातमीपत्र) पिएमपीएमएल बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस रस्ता सोडुन खड्डयात गेल्याने अपघात झाला असुन बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिएमपीएमएलची बस दौंड तालुक्यातील पारगाव ते पुणे स्टेशन ही १३७ नंबरची बस आज दि.४ रोजी जात असताना राहुगावाच्या पुढे सांगावी फाटा नजीक गेली असता बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस रस्ता सोडुन खड्डयात गेल्याने अपघात झाला असुन बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

या मार्गावरील पिएमपीएमएल बस वारंवार नादुरुस्त होतात तसेच बसची संख्या अचानक कमी करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याने प्रवाशांनी अनेक वेळा विनंती करून देखील पीएमपीएल प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!