दौंडमध्ये “आयुष्यमान भव:” मोहिमेचा माजी आमदार रंजना कुल यांचे हस्ते शुभारंभ………
दौंड (टीम – बातमीपत्र)
“आयुष्यमान भव:” या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार रंजना कुल यांचे हस्ते करण्यात आला आहे.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भव या मोहिमेतंर्गत आरोग्य विभागाच्यावतीने आयुष्यमान आपल्यादारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहिम, अवयवदान जागृती मोहिम, आयुष्यमान सभा,अंगणवाडी व प्राथमिक शाळेमधील मुलांची( ० ते १८ गटातील) आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या आयुष्यमान भवः या मोहिमेतंर्गत दर आठवडयास आरोग्य मेळाव्याचे दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे.
त्याअंतर्गत प्रामुख्याने स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, कान नाक घसा तज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसिक आजार टेली कन्सलटन्सी इत्यादि तज्ञ यांचे मार्फत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रक्तदान व अवयवदान याकरिता प्रेरित करण्यात येईल.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, बाजारा समितीचे सभापती गणेश जगदाळे,माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य राजु गजधने , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुभाष व्ही. खिल्लारे व इतर वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन नेत्रचिकित्सा अधिकारी टी. डी. शिंदे यांनी केले.