विशेष बातमी

महाराष्‍ट्राच्या राहुल जोगदंडची आनंदगाव ते दुबई यशस्वी भरारी …

खरं पाहिलं तर राहूल शंकर जोगदंड यांची ही एक विलक्षण यशोगाथा आहे. राहुल जोगदंड हे केज तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवाशी आहेत. राहूल यांचा प्रवास संघर्षमय आहेच शिवाय तेवढाच अभिमान वाटावा असाही आहे. जीवनाच्या वाटेवर कठीण समस्यांचा सामना करुन परिस्थितीवर मात करत यशाचं शिखर गाठून त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे असं म्हणतात हे वाक्य राहुल यांच्या प्रवासाला साजेसं असं आहे. यश मिळवण्यासाठी कसल्याही प्रकारचा शॉर्टकट पर्याय नसतो याचं ज्ञान राहूल यांना होतं, त्यामुळं त्यांनी अगदी लहानपणापासूनच चिकाटी व जिद्दी स्वभाव असल्यामुळं एखादं काम हाती घेतलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नसायचे. विदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणींचं असतं पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं, ते राहूल यांनी आधीच पूर्ण केलं आहे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचा सर्वांना अभिमान वाटत आहे.

आज ते के .एस. ए. येथे ज्या कंपनीमध्ये  मॅनेजमेंट टिम मध्ये कार्यरत आहे त्या ठिकाणी त्यांच्या अंडर इजिप्त, येमेन, सौदी, बांग्लादेश, पाकिस्तान, फिलीपाईन्स, भारत व इतर देशातील कर्मचारी काम करत आहेत  हा खुप कौतुकाचा विषय आहे, यातून त्यांनी केलेला आयुष्यातला संघर्ष दिसतो. इयत्ता 12 वी पर्यंत  त्यांचं शिक्षण त्यांच्या गावी झाले, त्यानंतर त्यांनी पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं त्यामध्येही ते उत्तीर्ण झाले एस आय एच एम इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणे  या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं व त्यानंतर सहा महिन्याची इंटरनशिप इंडीयन लग्झरी कलेक्शन हॉटेल आय टी सी विंडसर मणेर हॉटेल बेंगलोर येथे पूर्ण केली. त्यानंतर पुणे या शहरात येऊन त्यांनी फाईव्ह स्टारहॉटेल रॅडीसोन ब्लु पुणे मध्ये काही कालावधीत जॉब केला. तीन वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी दुबई येथे जे ए द रिसॉर्ट अँड हॉटेल दुबई येथे जॉब मिळवला. या हॉटेलमध्ये त्यांनी सलग पाच वर्षे उत्तम काम केले. आता ते सध्या एम एच अलशाया हॉटेल अँड रिटेलस मॅनेजमेंट के एस ए कंपनी मध्ये मॅनेजमेंट टिम मध्ये अतिशय स्वत:ला झोकून देऊन अनेक देशाच्या व्यक्तींसोबत काम पाहत आहेत. तसेच राहुल त्याच कंपनीमध्ये ऑपरेशन व स्टाफ ट्रेनिंग असे दोन विभाग सांभाळत आहेत. त्यांनी शिक्षण घेतलेल्या कॉलेजचे ते पहिले विद्यार्थी आहेत की, जे एवढया मोठया टॉपर एम.एच.अलशाया हॉटेल व रिटेल्स मॅनेजमेंट केएसए कंपनीमध्ये जॉब करतात. तसेच त्यांनी आजपर्यंत कित्येक गरजु तरुणांना मार्गदर्शनक केले आहे व विदेशात विनामूल्य जॉब मिळवून दिला आहे हे खूप मोठं सामाजिक योगदान राहुल जोगदंड यांचं आहे. त्यांनी केलेल्या अशा देशसेवेचे खंरंच कौतुक वाटते.

राहूल जोगदंड यांनी त्यांच्या आयुष्यात जे जे स्वप्नं पाहिले ते ते त्यानं पूर्णत्वास नेले आहेत हा खरोखरंच पंचक्रोशीत अभिमान वाटावा असा चर्चेचा विषय आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास इथपर्यंत थांबवला नाही तर, त्यांचं आणखी एक स्वप्नं त्यानं मिडीयाशी बोलतांना स्पष्ट केलं आहे की, दुबई मध्ये स्वत:चं रेस्टॉरंट स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे व ते या शिखरावरही लवकरच पोहचेतील यात तीळमात्र शंका नाही. त्यांनी विदेशात जाऊन तिथली आरबी भाषा शिकली व त्या भाषेत आज ते प्रविण झाले आहेत , की त्यामुळे त्याचं तिथले टॉपर लोकं त्याची प्रशंसा करतात कारण आरबी भाषा शिकणं खुप अवघड बाब आहे, पण राहुल त्यास अपवाद ठरले हे खुप मोठं विशेष आहे. शुन्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभं राहता आलं पाहिजे, पण राहुल यांच्या आयुष्यात तेवढं सुध्दा कोणीही उभं राहिलं नाही. कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहिले, शर्यत अजून संपलेली नाही, कारण कारण मी अजून जिंकलेलो नाही ! असं सतत स्वत:ला सावरुन संकटांवर मात करुन राहुल यांचा जीवनप्रवास सुरुच होता.

जेवढी मोठी स्वप्‍नं असतात तेवढी मोठी ताकद ती पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लागते व  संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्ची करावं लागतं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यास तेवढा मोठा त्यागही करावा लागतो या गोष्टी राहूल यांनी स्वत: आयुष्यात केल्या असल्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही तो दुरुस्त करुया, असा स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते असं राहुल यांना सतत वाटायचं. सतत चांगल्या विचारांचा पाईक होऊन संकटांवर त्यानं मात केली व ते आज खरंच जिंकले आहेत.

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही असं व्यक्तीमत्व असणं म्हणजे जगासाठी एक आदर्श आहे. तरुणाईला मार्गदर्शन व्हावं असं उमदं व्यक्तीमत्व म्हणजे राहुल जोगदंड. निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता असते, पण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव राहुलवर पडल्यामुळं त्यांनी सर्वच जिंकलं होतं, पण त्यांना त्यांच्या खडतर प्रवासचा डोंगर आणखी चढायचा बाकी होता.

आयुष्याचा खरा खेळ तेंव्हा सुरु होतो जेंव्हा आपल्याया सर्वांनी आयुष्यात साथ देणे सोडलेलं असतं आणि राहूल यांच्या आयुष्यात देखील तसंच घडलं, त्यांच्या आयुष्यात अनेकांनी त्यांची साथ सोडली व त्यांना मदत करण्याचं सोडून त्यांना बरेवाईट बोलत असे. आयुष्याच्या वळणावर माणसाचा एक टर्नींग पॉईंट असतो,  तेंव्हा त्यालां असं वाटतं की, आपल्याला कोणीतरी नातेवाईकांनी मार्गदर्शन करावं पण मार्गदर्शन तर सोडाच आपल्या नातेवाईकांनी त्रास दिला यापेक्षा जीवनात सर्वांत जास्त त्रासदायक गोष्ट कोणतीच नाही असं असलं तरी त्यांनी त्यावर मात करत ते यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या आायुष्यामध्ये त्यांना सतत मागे खेचण्याच प्रयत्न झाला परंतू त्यांनी खचून न जाता हिंम्मतीनं व कष्टाच्या जोरावर यश गाठलेच ही सर्वात महत्वाची कौतुकाची बाब आहे. नातेवाईक राहूल यांच्या आईवडीलांना नेहमी म्हणायचे की, याला शिकवू नका, याला शिकवून हा काय करणार आहे, त्याला तुम्ही  सरळ कुठेतरी कामावर ठेवा म्हणजे तुम्हाला सुध्दा आर्थिक हातभार लागेल. पण त्याच्या आईवडीलांना असं करायचं नव्हतं, आपलं पोरगं शिकलं पाहिजे व त्यानं मोठं काम करुन मोठा माणूस व्हावं असं त्यांचं स्वप्नं होतं त्यामुळे राहूल यांच्या आईवडीलांनी कोणाचं काहीच ऐकलं नाही व अपार कष्ट करुन त्यांना शिकवून लहानाचं मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम केलं.

राहूल एक असं उमदं व्यक्तीमत्व आहे की, त्यानंही कष्टाची जाणीव व सत्याची कास कधीच सोडली नाही त्यामुळं त्याच्या क्षेत्रात नव्यानं येऊ पाहण्याऱ्यांना नक्कीच आदर्श व्यक्तीमत्व म्हणून राहूल यांच्याकडं पाहिलं जाईल हे नक्की. राहुल यांच्या यशाच्या शिखरावर पोहचेपर्यंत सर्वजण त्यांच्या हारण्याची वाट पहात होते, पण रात्रंदिवस अभ्यास करुन जिददीने त्यांनी विजय मिळवलाच व उत्तुंग भरारी घेतली हे तितकंच महत्वाचं आहे. एवढंच नाही तर घरच्या सर्व सदस्यांना ते सोबत घेऊन चालले व सर्वांना मदत करत करत तो इथपर्यंत आले याचा जास्त अभिमान वाटतो. आयुष्यात त्यांना अनेकवेळेला खूप मानसिक त्रास झाल पण ते कधीही डगमगले नाहीत, त्यांनी त्या कठीण समस्येतून मार्ग काढत स्वत:ला सांभाळले व ते पुढे चालत राहिले. माणसाला जीवनात हवं ते कधीच मिळत नाही पण जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जर केले तर ते नक्कीच मिळते हे सत्य आहे, राहुल यांना त्यांच्या पुढील आयुष्यात जे मिळवायचं आहे ते तर त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून मिळणारच आहे शिवाय त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या वतीने उदंड शुभेच्छा !

– शंकर चव्हाण, महाराष्ट्र राज्य 9921042422

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!