बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ हे शेतकरी व व्यापारी हित जपणारे – आमदार राहुल कुल
केडगाव (टीम – बातमीपत्र) दौंडच्या बाजार समितीने पाठीमागच्या काळात शेतकरी वर्ग आणी व्यापारी वर्गाला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले असून आताचे संचालक मंडळ शेतकरी व व्यापारी वर्गाचे हित जोपसण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले आहे. चौफूला (ता.दौंड) येथे दौंड बाजार समितीची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा व शेतकरी मेळावा पार पडला त्यावेळी आमदार कुल बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, दौंड बाजार समितीने कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून व्यापार वाढवावा. आपली बाजार समिती पुण्यात जिल्ह्यात अव्वल होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असून गरज पडल्यास केंद्रातून व राज्यातून निधी आणला जाईल अशी ग्वाही कुल यांनी दिली आहे. राजकारण विरहित कामकाज करून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संचालक मंडळास हातभार लावणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे त्याठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातुन सहकार्य घेऊन आवश्यक त्या ठिकाणी बदल केले जातील. सध्या दौंड तालुक्यात विना परवाना गुळ व्यापारी बेकायदेशीर रित्या बाजार समितीची लुट करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा बेकायदेशीर व्यापाऱ्यावर कडक पाऊले उचलली जातील अशा बोगस व्यापाऱ्यामुळे बाजार समिती अडचणीत येऊ शकते असे कुल म्हणाले आहेत. स्वच्छता, भौतिक सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना फायदा होईल असे कामकाज यापुढील काळात हे संचालक मंडळ करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कायद्याच्या चौकटीत राहून शेतकरी व व्यपाऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील . संचालक मंडळाने आज हि वार्षिक सर्वसाधारण सभा लोकशाही पद्धतीने घेतल्यामुळे संचालक मंडळाचे आभार हि आमदार कुल यांनी मानले.
सभापती गणेश जगदाळे म्हणाले की, दौंड, केडगाव, पाटस उपबाजार समिती मध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून शेतकरी हितासाठी समिती काम करणार आहे. पुढील काळात कांदा मार्केटची उणीव बाजार समिती भरून काढणार असल्याचेही जगदाळे यांनी सांगितले.
या सभेत चर्चा करताना साहेबराव वाबळे म्हणाले की, गेल्या १९ वर्षात पहिल्यांदाच संचालक मंडळाने अशी सार्वजानिक सर्वसाधारण वार्षिक सभा घेतली आहे. कांद्याला चांगला बाजारभाव देण्यासाठी बाजार समितीने पुढील काळात प्रयत्न करावेत. अशोक हंडाळ म्हणाले की , पहिल्यांदा सर्वसामान्य शेतकरी वर्गासमोर सभा घेतल्याने संचालक मंडळाचे अभिनंदन ठराव त्यांनी मांडला आहे. माजी संचालक मानसिंग शितोळे म्हणाले की, मागील काळात १ लाख रुपये सेस जमा झाला तर १० हजार रक्कम दाखवली जात असे. आणी त्यातील पैशातून फक्त सहली काढून मजा केली गेली. त्यांना आवरातील सध्या काट्या झुडपे देखील काढण्यात आल्या नाहीत.
यावेळी भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर,सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, नीलकंठ शितोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, तानाजी दिवेकर, एम डी फरगडे, गोरख दिवेकर व संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन संचालक अशोक फरगडे यांनी केले, प्रास्ताविक गणेश जगदाळे यांनी केले तर आभार संचालक अतुल ताकवणे यांनी मानले आहे.