आरोग्यराज्यविशेष बातमी
‘एक तारीख, एक तास’ स्वच्छतेसाठी अभियानाअंतर्गत राज्यात १९४२ टन कचरा जमा
मुंबई (टीम-बातमीपत्र)
स्वच्छताहीचसेवा अभियानाअंतर्गत आज राज्यात ‘एक तारीख, एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी १० ते ११ या कालावधीत राज्यातील सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १४५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यात मान्यवरांसह १६ लाख ४ हजार ९९५ नागरिकांनी सहभाग घेत सुमारे १९४२ टन कचरा जमा करण्यात आला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.