आरोग्यपुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
दौंडमध्ये मोकाट कुत्र्यांचा युवकावर हल्ला, युवक जखमी
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे . या मोकाट कुत्र्यांनी केला एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना घडली असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दौंड शहरातील युवक केदार लेले हे दि.४ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता शहरातील शालीमार चौक ते जय हरी चौक दरम्यान गाडीवर जात असताना अचानक मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये लेले यांच्या उजव्या पायास चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान , दौंड शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.