मैत्री फाउंडेशन” च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम
कोल्हापूर (टीम – बातमीपत्र)
वकिघोल’ हा बारावाड्यांचा एक निसर्गसंपन्न आणि सुंदर परिसर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्क्यात आहे.काळमवाडी धरणाचे जे बॅक वॉटर आहे. वकिघोल हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बारा वाड्याचा परिसर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे सुजलाम,सुफलाम दृश्य दिसते, त्यामध्ये या धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे मोठे योगदान आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर शासन ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देईल, त्या ठिकाणी धरणग्रस्तांच्या वस्त्या उभ्या राहिल्या. मात्र या पुनर्वशीत वस्त्या 40-50 वर्षानंतरही मुख्य प्रवाहात आलेल्या दिसत नाहीत असे असताना देखील अशाही बॅकवॉटरच्या पाठीमागल्या बाजूला अनेक छोट्या-मोठ्या वाड्या आजही अस्तित्वात आहेत. ज्यांचा संवाद संपर्क आधुनिक म्हणून घेतल्या जाणाऱ्या विकसित पण मतलबी जगण्याने हैराण झालेल्या जगासी फारसा येत नाही. आधुनिकीकरणाचा कोणताही गंध येथे पोचलेला नसल्यामुळे त्याचा परिणाम तेथील लोकांच्या जीवनमानावरती झालेला दिसून येतो.
शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग या बाबींचा अभाव या परिसरामध्ये दिसून येतो. खरंतर हा परिसर तिन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या दऱ्याखोर्यांनी व्यापलेला आणि जंगलाने झाकलेला आहे, तसेच एका बाजूला इंदिरा सागराने (काळामवडीचा जलाशय) व्यापलेला आहे. या परिसरामध्ये या बारा वाड्यांच्यामध्ये आडोली ही एक प्रमुख वाडी आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अतुल जोशी आणि डॉक्टर अजित पाटील यांनी माध्यमिक शाळा सुरू करण्याचे कार्य केले. या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आधुनिक जगाशी जोडण्याचा त्यांचा मुख्य हेतू होता. म्हणून त्यांनी महालक्ष्मी महाविद्यालय आडोली या शाळेची स्थापना केली. साधारणपणे अडीचशे – तीनशे असा इथला विद्यार्थ्यांचा पट आहे. हा परिसर प्रचंड पावसाचा आहे. पावसाळ्यामध्ये तीन- चार महिने विद्यार्थ्यांचे दप्तर शाळेतच असते. पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे दप्तर घेऊन शाळेत ये-जा करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. आजही त्यांना ओढे- नाले पार करत त्यांना शाळेला यावे लागते. पावसाच्या माऱ्यामुळे या ठिकाणी रेनकोट ही टिकत नाहीत,ही परिस्थिती आहे. म्हणून आपण जी प्लास्टिकची टिक्की वापरतो त्याचा ड्रेस शिवून रेनकोट म्हणून वापर केला जातो. एखाद्या वेळी एस.टी. आलीच नाही तर, शाळा बुडलीच म्हणून समजा, अशावेळी तेथील शिक्षक आपल्या गाड्यांचा वापर विद्यार्थ्यांना ने – अन करण्यासाठी करतात. या ठिकाणी उपलब्ध असणारे शिक्षक स्वखुशीने या विद्यार्थ्यांसाठी सतत झटत असतत. खरं म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला म्हणावे अशी परिस्थिती या परिसरातील लोकांची आहे. ज्या लोकांनी या धरणावर्ती आपल्या आयुष्यात समृद्धी फुलावली त्यांना मात्र, ज्यांनी आपली गाव सोडली, आपल्या जमिनी दिल्या, त्यांचा विसर पडला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यांनी आपले सर्वस्व धरसाठी दिले ती लोक मात्र लाभापासून फार दूर आहेत. समाजामध्ये असणारी ही दरी भरून काढण्याचे काम शासन आपापल्या परीने करीत आहे.
महालक्ष्मी महाविद्यालय अडोली या शाळेचा असणारा निकाल हा प्रत्येक वर्षी 100% असतो. सरासरी विद्यार्थी 80 ते 90 टक्केच्या खाली नसतो. हा येथील गुणवत्तेचा पुरावा आहे. शासन तसेच येथील शिक्षक आपापल्या परीने या विद्यार्थ्यांना मदत करीत असते. पण कांहीं सामाजिक जाणीव असणारे लोकही जे माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करतात अशापैकी लोकही मदत करत असतात. रयत शिक्षण संस्थेचे, रामचंद्र बाबुराव पाटील विद्यालय सडोली (खा)१९९५/९६ बॅचचे मा.विद्यार्थी यांनी सामाजिक भान ठेवून ‘मैत्री फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. शेती, प्रशासन, व्यवसाय, व्यापार, उद्योग, सहकार, राजकारण ते गृहिणी अशा वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या या मंडळींनी सामाजिक भान ठेवून ‘मैत्री फाउंडेशन’ हा ग्रुप फॉर्म केला आहे. हा ग्रुप प्रत्येक वर्षी शैक्षिणक मदत करत असतो. या वर्षी त्यांनी अडोली येथील या शाळेस मदत केली आहे. आपल्याला जे शक्य आहे ते ते करत राहायचे.
आपण पुढे गेल्यानंतर आपल्या मागे असनाऱ्याना हात द्यायाचा, याची जाणीव सर्वांचं असेल असे सांगता येत नाही, पण सर्वच चित्र असे नाही.हे ‘मैत्री फाऊंडेशन’ सारखी सामाजिक जाणीव असणाऱ्या मंडळी ही काही कमी नाहीत. आपले पोट भरल्यानंतर थोडे उपसी पोटी असणाऱ्या लोकांची आठवण असणे गरजेचे आहे ना !!
या वेळी वह्या,पेन,सिसपेन्सिल,शॉपनर,खोडरबर,A 4 size पेपर,मिनी स्केच पेन, camel पट्टी,ट्रान्सफ्रंट फोल्डर,डस्टर ,खडू बॉक्स,गम बॉटल बॉक्स,कटर ,प्रोजेक्ट पेपर ,कान टोपी, स्लीपर जोड अशी शालीय साहित्य देवून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मैत्री फाउंडेशन ने केले आहे.