दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी असलेला भीमा पाटस १ नोव्हेंबर रोजी सुरु होणार, १० लाख मे. टन पर्यंत ऊस गाळपाचे उद्दिष्ट.. भीमा पाटसला ऊस घालण्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांचे आवाहन
भीमा पाटस सहकारी साखर कारखाना गाळपासाठी सज्ज, तोडणी यंत्रणांचे करार पूर्ण पहिल्या दिवसापासून पूर्ण क्षमतेने कारखाना ऊस गाळप करणार
पाटस (टीम- बातमीपत्र) दौंड तालुक्यातील शेतकरीवर्गाच्या आर्थिक विकासाचे साधन असलेला पाटसचा भीमा सहकारी साखर कारखाना येत्या १ नोव्हेंबर रोजी सुरु होत आहे. ४० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यकम आ. राहुल कुल व पत्नी कांचन कुल यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल म्हणाले की, १ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. कै मधूकाका व कै सुभाष कुल यांचे कारखान्याच्या जडणघडणीत मोठे योगदान लाभले आहे. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या योगदानाच्या माध्यमातून भीमा पाटस कारखाना सुरु करण्याच्या बाबतीत मोलाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले गेले व निराणी ग्रुपच्या माध्यमातून हा कारखाना सुरु करण्यास महत्वाचे योगदान लाभले. तीन वेळ टेंडर होऊन ही कोणी पूढे आले नाही मात्र निराणी ग्रुप ने हा पुढाकार घेऊन परिसरातील शेतकऱ्याला सुगीचे दिवस आणले आहेत.
साखर कारखानी राज्यातील अडचणीत होती. मात्र राज्यसराकाने वेळोवेळी योगदान दिल्याने आज शेतकरी वर्गाला चांगले दिवस आले आहेत. निराणी ग्रुप ने क्रांतिकारक निर्णय घेतल्याने कारखाना आज चांगल्या प्रकारे वाटचाल करीत असून शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे योग्य बाजारभाव दिला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊन कारखान्याला सहकार्य करावे असे कुल म्हणाले आहेत.
आ. कुल म्हणाले की, साईप्रिया का ? निराणी ग्रुप ? हा विषय महत्व्वाचा नसून कारखाना सुरु होने गरजेचे होते. मागील हंगामत कमी कालावधीत ३ लाखा पर्यंत गाळप करण्यात आले. यावर्षी देखील १० लाख मे. टन पर्यंत साखर कारखाना गळीत करण्याचा मानस आहे. चांगल्या प्रकारे बाजारभाव देऊन ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला अडचणी येऊ देणार नाही. आपला कारखाना सहकारी असल्यानेच सर्वसाधारण सभेला सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. जो मला मतदान करीत नाहीत त्याची देखील इच्छा आहे की भीमा पाटस कारखाना व्यवस्थित चालावा. त्यामुळे कारखान्यावर बोट ठेवून कोणीही राजकारण करू नये कारण हे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संसाराचे ठिकाण आहे.
दौंडच्या पाण्याच्या संदर्भात देखील चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्याने आज एकही एकर बागायत जळाले नाही. बेबी कॅनॉल, जनाई शिरसाई, पुरंदर योजना या पाणी योजना देखील बंदनळीतून पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. खडकवासला धरण साखळीतून पुणे शहराचे पाणी खाली देण्याच्या बाबतीत विचारधीन निर्णय आहे. मुळशी धरणाचे पाणी दौंडच्या ग्रामीण भागात आणणे हा विषय देखील प्रक्रियेमध्ये आहे. पुढील ५० वर्षाच्या दौंडच्या विकासाचे कै. सुभाष आण्णा कुल यांनी पाहिलेले स्वप्न आपण लवकरच पूर्ण करणार आहोत. थोड्याच दिवसात उन्हाळ्याच्या कालावधीत सगळीकडे पाणी कमी पडेल मात्र दौंड मध्ये हे पाणी कमी पडणार नाही ही १०० टक्के खात्री देतो असे कुल म्हणाले आहेत.
कारखान्याचे संचालक विकास शेलार म्हणाले की, दिल्ली मध्ये साखर उद्योग धोरणा विषय अनेक बैठकी पार पडल्या गेल्या मागील ४० वर्षात जे निर्णय झाले नाहीत ते निर्णय आज घेण्यास आ. राहुल कुल यांच्या माध्यमातून भाग पाडून साखर उद्योगाला चांगले दिवस आज आ. कुल यांच्या माध्यमातून आले आहे. शेतकरी वर्गाची आर्थिक उलाढलीचे साधन असलेली ही जीवनदयानी सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानचे वातावरण आहे. कारखाना सुरु झाल्याने आज शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता आज खऱ्या अर्थाने दौंड तालुक्यात आली आहे.
कार्यकारी संचालक रविकांत पाटील म्हणाले की, भीमा पाटसचे ५ हजारपासून ते १० हजारा पर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. १ तारखेला कारखाना सुरु होणार आहे. निराणी ग्रुपचे संस्थापक मृगेश निराणी, संगमेश निराणी, विशाल निराणी यांचे देखील मार्गदर्शन लाभत आहे. उसाला चांगला बाजारभाव देऊन वेळेत पगार देण्याचा आमचा मानस असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आज आ.राहुल कुल व निराणी ग्रुप यांच्या माध्यमातून आले आहेत.
यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर हनुमंत वाबळे, नंदू पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी माजी आमदार रंजना कुल, उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, कार्यकारी संचालक रविकांत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, संचालक मंडळ, कामगार व सभासद वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन व प्रास्ताविक संचालक विकास शेलार यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी मानले आहे.