दौंडमधील मलठण मतदान केंद्रावर लाईट लावून मतदान सुरु, मतदान केंद्रावर अजूनही लांबलचक रांग……
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील मलठण येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याने चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्व भागातील मोठ्या ग्रामपंचायतच्या या निकालाकडे तालुक्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अतिशय अटा-तटीच्या लढतीमध्ये ग्रामपंचायतसाठी काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या निर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणापासून पळापळ करून मतदान जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. मलठण येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत चालू आहे. आत्ता साडेसहा वाजले असले तरीही मतदान सुरु आहे.