भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या बारामती लोकसभा संयोजकपदी अझरूद्दीन मुलाणी यांची निवड
दौंड (टीम – बातमीपत्र)
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा बारामती लोकसभा संयोजकपदी ॲड.अझरुद्दीन मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने महाविजय 2024 अभियानाअंतर्गत सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये अल्पसंख्याक बहुल विभागातील बूथ स्तरावर विविध कार्यक्रम व पक्ष संघटन अधिक बळकट करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने लोकसभा क्षेत्रामधील अल्पसंख्याक बहुल विभागात बूथरचना मोर्चा संघटनात्मक व रचनात्मक कार्यास अधिक गती देण्यासाठी प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाने प्रत्येक लोकसभा क्षेत्राकरिता अल्पसंख्यांक लोकसभा संयोजक नियुक्त केलेले आहे.
ॲड.अझहरुद्दीन मुलाणी हे दौंड तालुक्यातील मळद गावचे रहिवाशी असून त्यांनी यापूर्वी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीने त्यांचे परिसरात स्वागत होत आहे.