पुणे (टीम – बातमीपत्र)
दुचाकी चोरी करणाऱ्या शुभम जाधव यास अटक करण्यात आली असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी पथक 2 , गुन्हे शाखेचे पुणे शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४/११/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे त्यांच्या स्टाफ सोबत खाजगी वाहनाने वाहनचोरी, करणारे तसेच गुन्हयातील पाहिजे व फरारी गुन्हेगार यांचेवर कारवाईसाठी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना वेळी पोलिस हवालदार दत्तात्रय खरपुडे आणि पोलिस शिपाई विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , आण्णासाहेब कॉलेज जवळ इंद्रप्रस्थ कॉ.ऑप.सोसायटीच्या फेज मांजरी रोड हडपसर पुणे येथे एक इसम होंडा ऍक्टिवा गाडीचे लॉक खोलत आहे. त्यांच्याकडे असलेली गाडी चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याला वरिष्ठांचे आदेशाने ताब्यात घेतले असता त्यांचे नाव शुभम नथुराम जाधव ( वय 23 , रा. साई सत्यम पार्क लेन 1, वाघोली, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कडून 2 दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.या मोटार सायकली जप्त केल्या आहेत. यावर हडपसर पोलीस स्टेशन व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत .
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे)रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे , सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे, दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाने, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.