पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत शेळके …..
केडगाव(टीम – बातमीपत्र)
केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रशांत शेळके यांची निवड झाली आहे.
आज दि.23 रोजी केडगाव
ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत अपक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रशांत शेळके यांना दहा मते पडले असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. अपक्ष प्रशांत शेळके यांना आमदार राहुल कुल यांच्या गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे.