पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
युवकांमुळे वाचले साळींदरचे प्राण…
केडगाव (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील पारगाव येथील युवक किरण रणदिवे व निलेश धुमाळ यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या एक जखमी साळींदराला उचलून आणून त्याच्यावर शासकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार केले.
नानगांव- पारगाव रस्त्याच्या कडेला वाहनाच्या धडकेने एक मादी जातीचे पूर्ण वाढ झालेले व सुमारे २७ किलो वजनाचे साळींदर जखमी अवस्थेत पडल्याचे किरण रणदिवे व निलेश धुमाळ यांनी पाहिले.त्याच्या शेपटाच्या भागापासून रक्तस्राव होत होता.त्यास तात्काळ शासकीय जनावरांच्या दवाखान्यात डॉ.झाडे यांचे कडे आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वनविभाग कर्मचारी यांच्या कडे सुपूर्द केले.