कृषीपुणे जिल्हा ग्रामीण
दौंडमध्ये अवकाळी पाऊस सुरु…. , शेतकरी चिंतेत…
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरासह परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. मागील दोन ते दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत होता. कधी थंडी, गरमी तर पावसाचे वातावरण अशी अवस्था होती. त्यातच आज संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या अवकाळी पावसास अचानक सुरवात झाली. हा पाऊस दौंड शहरासह आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.