आरोग्यपुणे जिल्हा ग्रामीण

मराठी पत्रकार परिषेदच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…….

दौंड (टीम – बातमीपत्र)

मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त दौंड येथील योगेश्वरी हॉस्पीटल व दौंड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज दि. ३ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त दौंड येथील योगेश्वरी हॉस्पीटल अँड आय सी यु व दौंड तालुका पत्रकार संघ

यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यावेळी योगेश्वरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सिध्दार्थ कुलकर्णी व संचालिका क्षितीजा कुलकर्णी व त्यांच्या उपस्थितीत स्टाफने पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. डॉक्टर सिध्दार्थ कुलकर्णी यांनी आरोग्य विषयक सल्ला दिला. यावेळी दौंड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश वत्रे, राजू जगदाळे दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र जगताप, माजी अध्यक्ष रवींद्र खोरकर, रामदास डोंबे, संतोष काळे, मंगेश पायगुडे, अमर परदेशी,निलेश जांबले आदी पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!