क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

दोन सख्ख्या भावांच्या मृत्यने केडगाव हादरले !

दौंड (टीम – बातमीपत्र)

पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव (ता.दौंड) गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – सोलापूर महामार्गावर केडगाव(ता.दौंड)हद्दीत सह्याद्री पत्रा कंपनी जवळ महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत केडगाव येथील पांडुरंग दत्तात्रय शेळके आणि कैलास दत्तात्रय शेळके ( दोघांचे वय अंदाजे ५० ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली असून याबाबत रविवारी रात्री उशिरा पर्यंत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .

दोघा सख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती .

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!