३२ हजार बोगस मतदार नोंदणी करणारी दाजी मेहुण्याची जोडी……
पुणे (टीम – बातमीपत्र)
पुरंदर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पळुस कडेगाव या विश्वजित कदम यांच्या मतसंघातील ३२३६६ मतदारांची बोगस नोंदणी ही पुरंदर हवेली मतदारसंघात करण्यात आल्याने २०१९ साली पुरंदर हवेली मतदारसंघातून विश्वजित कदम यांचे मेहुणे संजय जगताप हे भ्रष्ट पध्दतीने निवडून आले आहेत.असे गंभीर आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहेत त्यांनी आपल्या फेसबुक पेज वर याबाबत अधिक माहिती देताना सांगितले आहे की
३२२६६ बोगस मतदार हे पुरंदर हवेलीतील शहरी भागात नोंदवले गेले जसे की आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, भेकराई नगर, फुरसुंगी, देवाची उरुळी, नीरा शहर, सासवड शहर आणि जेजुरी शहर या सर्व भागात बोगस मतदार नोंदणी केली गेली.
याबाबत निवडणूक आयोगाकडे मी सर्व पुरावे सादर केले आहेत आणि ही नावे मतदार यादीतून वगळावी ही मागणी केली आहे. सोबतच ज्यांची नावे दोन वेळा आहेत अशा बोगस मतदारांवर व ज्यांनी ही नावे नोंदवून घेतली अशा तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशीही मागणी केली. यासाठी माझ्याकडून सतत पाठवपूरावा देखील सुरू राहणार आहे.
ही फक्त निवडणूक आयोगाची फसवणूक नसून पुरंदर हवेली तालुक्यातील तमाम नागरिकांची फसवणूक आहे. जनता येणाऱ्या निवडणुकीत यांना योग्य तो धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असेही माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी म्हंटले आहे