मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा…..
यवत (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मराठी वृत्तपत्र विश्वाचे जनक दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. ज्या दिवशी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरु करण्यात आले तो दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार दौंड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र जगताप यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश वत्रे, हितेंद्र गद्रे, मनोज कांबळे, जीवन शेंडकर उपस्थित होते. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांचा जिवन परिचय व मराठी पत्रकारितेचा प्रवास या विषयी अध्यक्ष नरेंद्र जगताप यांनी माहिती दिली. केले तर सदस्य जीवन शेंडकर यांनी कार्यक्रमाचे समापन केले. या वेळी स्व.कमलताई परदेशी यांना आदरांजली वाहण्यात आली.