प्रधानमंत्री नरेंद्र मोदींमुळे रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल – केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील
दौंड (टीम – बातमीपत्र)
2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल झाले असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली .
ते दौंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल , भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल , तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे , शहराध्यक्ष स्वप्निल शहा , रेल्वे संघटनांचे विविध पदाधिकारी व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की , दौंडचे आमदार राहुल कुल हे रेल्वेच्या प्रश्नाबाबत दिल्ली भेटत असतात.ते दिल्ली मध्ये आल्यानंतर त्यांनी मला विनंती केली की तुम्ही दौंडला भेट देवुन तेथील समस्या आमच्या प्रवाशांकडून , नागरिकांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून ऐकाव्यात व त्यावर मार्ग काढावा म्हणूनच आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये अनेकांनी रेल्वे प्रशासनाच्या सोयीसुविधांबाबत माहिती दिली व निवेदन दिले आहेत त्यावर सकारात्मक कारवाई होईल असेही दानवे पाटिल यांनी सांगितले.
दौंड शहरात लोकोशेडचे काम प्रगतीपथावर असून ते काम आगामी एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल हे काम पूर्ण झाल्याने येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. आमदार राहुल कुलांनी रेल्वे बाबत अनेक प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची योग्य ती दखल घेऊन ते सोडविण्यात येणार असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.