पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
पुणे जिल्हास्तरीय कुमार निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत कर्मयोगी कुस्ती केंद्राचे दोन कुस्तीगीर प्रथम …
दौंड (टीम – बातमीपत्र)
सह्याद्री कुस्ती संकुल वारजे येथे झालेल्या पुणे जिल्हा स्तरीय कुमार निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत कर्मयोगी कुस्ती केंद्राचे कुस्तीगीर प्रशांत रुपनेर याने ५१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला व आदित्य जगताप याने ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही कुस्तीगिरांचे रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही कुस्तीगिरांना राष्ट्रीय कुस्ती पंच रवी बोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले .
या दोन्हीही कुस्तीगीरांचे दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल मोरया उद्योग समूहाचे माऊली ताकवणे,सोसायटीचे संचालक सर्जेराव जेधे यांनी अभिनंदन केले.