आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन ,आमदार राहुल कुल राहणार उपस्थित……
राजेगाव (टीम – बातमीपत्र)
आमदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान रविवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी मलठण (ता.दौंड) येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता प्रमुख उपस्थित म्हणून दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित राहणार आहेत
दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य घनश्याम देवकाते, स्वामी चिंचोली गावचे माजी सरपंच अझरुद्दीन शेख, वाटलुजचे माजी सरपंच युवराज शेंडगे, मलठण येथील युवक कार्यकर्ते अमर परदेशी, राजेगाव येथील मुकेश गुणवरे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे
दौंड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचु मोठी बैलगाडा शर्यत रंगणार असल्याने याची जोरदार तयारी मलठण – स्वामी चिंचोली गावच्या शिवारात चालू असून यासाठी जिल्ह्यातील व परिसरातील सर्व बैलगाडा मालकांनी व चालकांनी शर्यतीसाठी नाव नोंदणी करायची आहे. याकरिता सर्व गट पास होणाऱ्या गाड्यांसाठी आकर्षक चषक व सेमीसाठी पात्र होणाऱ्या सर्व गाड्यांसाठी टी-शर्ट देण्यात येणार आहेत. बक्षीस विजेत्या बैलगाडा मालकाला प्रथम क्र.७१,०००, द्वितीय क्र.५१,०००, तृतीय क्र.३१,०००, चतुर्थ क्र.२१,०००, पाचवा क्र.११,००० व सहावा क्र.७,००० रुपये अशी रक्कम रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता काही नियम व अटी लागू असतील. या स्पर्धेकरिता अधिक माहितीसाठी असीम शेख, झहीर शेख, हसन शेख यांच्याकडे संपर्क साधायचा आहे