पोलिस शिपाई पदासाठी बनावट खेळाडूचे प्रमाणपत्र देणाऱ्यावर गुन्हा दाखल……..
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ मधील पोलीस शिपाई भरतीमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई हे पद मिळवण्याकरीता खेळाचे अवैद्य क्रीडा प्रमाणपत्र दाखल केल्याने पोलीस शिपाई सुशील केशवराव वाघमारे याच्या विरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , आरोपी सुशील केशवराव वाघमारे (वय 33 , सध्या नेमणूक स्थानिक कंपनी राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक ५, मूळ राहणार , पंजाब कॉलनी , वर्धा ता. जि. वर्धा) याने दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ या आस्थापनेवरील शिपाई भरती मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई हे पद मिळविण्याकरता त्याने खेळाडू या प्रवर्गात अवैध प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व श्री छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी ,पुणे यांच्या नावाचे लेटर हेड ,सही शिक्के डुबलीकेट मारून हे अवैद्य प्रमाणपत्र सादर केले होते. याची पडताळणी केली असता हे सर्टिफिकेट बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने या विरोधात राज्य राखीव पोलीस दल गट 5 चे सुनिल तुळशीराम सरोदे यांनी फिर्याद दाखल केली असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक गटकुळ करीत आहेत.