राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणुन बोत्रे यांची निवड…….
पारगाव (टीम – बातमीपत्र)
पारगाव (ता. दौंड) येथील प्रदीप बोत्रे यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय पंच म्हणून नियुक्ती केली आहे. २३ वर्षांनंतर प्रथमच महाराष्ट्रात वरिष्ठ राष्ट्रीय (सीनियर नॅशनल) अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २९ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान खराडी येथे झाली. यामध्ये पुणे जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे बोत्रे यांना प्रथमच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अधिकृतपणे संधी दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, दिनेश गुंड, हिंद केसरी योगेश दोडके, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश सावंत, मारुती सातव, महाराष्ट्र टीमचे कोच मोहन खोपडे, नवनाथ घुले उपस्थित होते. सदर कामगिरी बद्दल दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष माऊली ताकवणे आणि मेघराज कटके यांनी प्रदीप बोत्रे यांचे अभिनंदन केले.
या वेळी बोलताना प्रदीप बोत्रे यांनी भविष्यात होणाऱ्या आंतर राष्ट्रीय कुस्ती पंच परीक्षा देण्याचा मानस व्यक्त केला.