पुणे (टीम बतमीपत्र) महसूल विभागातील महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या गाव कामगार तलाठी या नावात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संभाजीनगर मध्ये तलाठी संघटनेच्या अधिवेशनादरम्यान बोलताना जाहीर केला आहे
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की तलाठी हे नाव आता इतिहास जमा होणार असून यापुढे गावातील महसूल विभागाचा कारभार पाहणाऱ्या व्यक्तीला ‘ग्राम महसूल अधिकारी’ असे संबोधण्यात येणार आहे