विशेष बातमी
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप सुरू*
शेवगाव तालुका प्रतिनिधी प्रविण भिसे
भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष कल्याण महाराज पवार यांच्याकडून विद्यमान महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या आदेशावरून श्री क्षेत्र अयोध्या श्रीराम मंदिर श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करताना थोडासा उशीर झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून वाटप चालु केल्याबद्दल नागरिकांमधुन समाधानाचे वातावरण तयार झाले आहे
दरम्यान 100 रु मध्ये सहा कीराणा वस्तु दहीगाव-ने येथे लाभार्थीस देण्यात आल्या यावेळेस उपस्थित जिल्हा चिटणीस लक्ष्मण काशीद , जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष बशीर पठाण, आदिल पठाण, सचिन खंडागळे,ता कार्यकारिणी सदस्य व स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुका कार्याध्यक्ष शरद थोटे, शेवगाव ता.युवक कार्याध्यक्ष प्रविण भिसे,अशोक दळवी ,सर्जेराव नरे,कडुबाळ सातपुते व ईतर लाभार्थी ग्रामस्थ दहिगाव, ने घेवरी व प्रत्येक लाभार्थी कुटुंबियांस मिळाला पाहीजे या करीता सेवा सोसायटी दहिगाव ने धान्य कर्मचारी संजय मरकड साहेब यांना सुचना दिल्या ज्या कुटुंबियांस रेशन शासकीय नियमानुसार मिळत नसेल किंवा कमी मिळत असेल किंवा मिळतच नसेल अशा नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे