दौंड , हवेली, इंदापुरकरांना मिळणार उन्हाळी दोन आवर्तने, आमदार राहुल कुल यांच्या मागणीला यश……..
दौंड (टीम – बातमीपत्र)
खडकवासला कालव्यातून दोन उन्हाळी आवर्तने देण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली. ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक शासकीय विश्रामगृह पुणे येथे पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व तसेच जलसंपदा व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळावीत .शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन व खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी कुल यांनी केली.
दोन आवर्तने देण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.