क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

महाराष्ट्र बँकेच्या वसुली अधिकाऱ्याचा खून करणाऱ्यास अटक , दौंड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई….

 दौंड (टीम- बातमीपत्र)

‘रस्त्याने जाणाऱ्या वाहणांमुळे मला त्रास होतो.जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात…असे सांगणाऱ्या एका आरोपीने त्रास होतोय या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत वाद घालून हातातील धारदार सुरा मारला असून या घटनेत त्याचा जीव गेला आहे. घटनेचा शोध लावत दौंड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,’मयत प्रवीण मळेकर (वय-५८) हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते.ते दि.१ रोजी रात्री आपल्या मोटारसायकलवरून बारामतीहुन कुरकुंभ येथे जात असताना वासुंदे ता.दौंडच्या हद्दीत एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून केल्याची फिर्याद त्यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती. फोनवरून माहिती मिळताच या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यांनीही घटनास्थळी भेट देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.

घटनेचा सखोल तपास करताना पोलिसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली, अनेकांशी विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावून आरोपीचा माग काढला. याअगोदरही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकी साठी वापर केला असल्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आरोपी दिपक रामदास लोंढे वय-३७ वर्षे (रा.वासुंदे ता. दौंड) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी केली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!