पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

श्री. इंद्रेश्वर ग्रामयात्रेला सुरुवात ; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवण्यास मिळणार….

इंदापूर (टीम – बातमीपत्र)
इंदापूरचे ग्रामदैवत असलेले श्री. इंद्रेश्वर महादेवाची ग्रामयात्रा व भव्य रथोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सोमवारपासून ते शनिवारीपर्यंत इंदापुरात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवण्यास मिळणार असल्याची माहिती ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र वाशिंबेकर यांनी दिली..

कार्यक्रमाची सुरूवात सोमवारी (दि.४) पासून श्री गणेश शिवपंचायतनपूजन व श्री शिवलीलामृत पारायणाने होणार आहे. मंगळवारी (दि.५) श्री शिवलीलामृत पारायण होणार आहे. बुधवारी (दि.६) श्री. गणेश स्थापना व ध्वजपूजन, बालसंस्कार वर्ग व संतवाणी अभंगांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.७) ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर महादेवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक व ध्वज नगरभ्रमणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी इंदापुरातील समस्त तिळवण तेली समाजाच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि.८) महाशिवरात्री असल्याने हा दिवस यात्रेचा खास दिवस असणार आहे. या दिवशी दिपपूजन, महाआरतीसह रात्री १२ नंतर श्री महादेवास बिल्वपत्र अर्पण सोहळा व महापूजा होणार आहे. यात्रेच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि.९) सकाळी १० वाजता हभप संतोष महाराज गाडेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाआरती ५६ भोग व महाआरती होणार आहे.

तरी शहरातील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी ग्रामयात्रा, रथोत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तसेच अन्नदानासाठी ट्रस्टशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे. देवराज दीक्षित ,अशोक घोडके,गिरीश गुरव हे उपस्थित होते

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!