खासदार शरद पवार व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यात बंद दाराआड चर्चा……..
दौंड (टीम – बातमीपत्र)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हे आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कटारिया समर्थकांनी गर्दी केली होती. माजी नगराध्यक्ष कटारिया यांच्या ऑफिसमध्ये बंद दाराआड खासदार पवार आणि कटारिया यांच्यामध्ये चर्चा झाली. याप्रसंगी बारामती लोकसभा मतदासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.खासदार पवार व कटारिया यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नसला तरीहि अनेक चर्चांना यामुळे उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.