पुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहरविशेष बातमी

दोन घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त , आचारसंहिता काळातील कारवाई……

पुणे (टीम – बातमीपत्र)
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून १३ लाख ९० हजाराच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत १० एप्रिल रोजी दुपारी शिरुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली. सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!