बारामती लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार……..
दौंड (टीम – बातमीपत)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज (दि.12) शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. 19 एप्रिलपर्यंत असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी दाखल करता येणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर- वेल्हा-मुळशी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 23 लाख 62 हजार इतके मतदार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय कार्यालय पुणे विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बारामती मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – दि. 12 एप्रिल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 19 एप्रिल
उमेदवारी अर्जाची छाननी – दि.20 एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि.22 एप्रिल
मतदानाचा दिवस : दि. 7 मे मतमोजणी दिवस : दि. ४ जून