सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल……..
पुणे (टीम – बातमीपत्र)
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज दि. 18 रोजी महायुतीच्यावतीने सुनेत्रा पवार व महाविकास आघाडी यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय मंत्री रामदास आठवले , आमदार राहुल कुल , माजी मंत्री विजय शिवतारे , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . महायुतीच्या वतीने अर्ज दाखल करतेवेळी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरीता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , आमदार अशोक पवार , आमदार विश्वजीत कदम , आमदार संजय जगताप , आमदार सचिन अहिर हे उपस्थित होते.
महविकास आघाडीकडूनही शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्यात आला.
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्याचे लक्ष वेधणारी निवडणूक होणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे त्यामुळेच आज अर्ज दाखल करतेवेळी शक्ती प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार होते त्यामुळेच दोन्हीही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले.