दौंडमध्ये शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन …….
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहर व तालुका शिवजयंती समितीच्या वतीने महाराष्ट्रदिनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
तिथीनुसार साजरी होणार्या शिवजयंती निमित्त दौंड – सिध्दटेक अष्टविनायक मार्गावरील भीमनगर येथील स्वर्गीय लाजवंती गॅरेला विद्यालयात बुधवारी (ता. १ ) सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेसाठी पहिला गट ( इयत्ता १ ली ते ४ थी ), दुसरा गट ( इयत्ता ५ वी ते ८ वी ) , तिसरा गट ( इयत्ता ९ वी ते १२ वी ) आणि चौथा गट – खुला गट , असे चार गट तयार करण्यात आले आहेत. खुल्या गटासाठी (१) पर्यावरण रक्षण – नागरिकांची जबाबदारी, (२ ) स्त्री खरच सुधारली आहे का ? ( ३ ) भारतीय आरमाराचे जनक – छत्रपती शिवाजी महाराज (४) आरक्षणाचा सामाजिक आक्रोश , असे चार विषय देण्यात आले आहेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेचे नियम, गटनिहाय विषय, विनामूल्य नाव नोंदणी व माहितीसाठी शिक्षक तथा संयोजक सोमनाथ लवंगे ( ७०८३२७६१८३) किंवा डॅा. प्रा. अरूणा मोरे ( ९८५००१४५७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.