मनोरंजनराष्ट्रीय

चेन्नईची डोकेदुखी वाढली; चहर दुखापतग्रस्त, पथिराणा-तीक्षणा मायदेशी रवाना

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला चेपॉकवर पंजाबविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात चेन्नईचे महत्त्वाचे गोलंदाज संघाबाहेर असल्याचा त्यांना मोठा फटका बसला. तर पुढील काही सामन्यांतूनही हे गोलंदाज बाहेर असणार आहेत.

चेपॉकच्या मैदानावर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. आयपीएलमधील चॅम्पियन चेन्नईचा संघ या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. चेन्नईने केलेली १६२ धावसंख्या ही दव पाहता अगदी सहज गाठण्याजोगी होती आणि पंजाबनेही अगदी तेच केले. या सामन्यात चेन्नईची मोठी अडचण ठरली ते म्हणजे संघातील मुख्य गोलंदाजांची अनुपस्थिती. संघाचे बहुतेक मुख्य वेगवान गोलंदाज संघाबाहेर आहेत.

चेन्नईचे महत्त्वाचे गोलंदाज उपलब्ध नसल्याने संघाला त्याचा मोठा फटका बसत आहे. दीपक चहरची दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे. किरकोळ दुखापतीमुळे या हंगामातील पूर्वीचे दोन सामने न खेळलेल्या चहरला बुधवारच्या सामन्यात दोन चेंडू टाकल्यानंतर पुन्हा त्रास झाला,ज्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. पंजाबविरूद्धचा संपूर्ण सामना संपेपर्यंत चहर मैदानात परतला नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरने त्याचे षटक पूर्ण केले. तर संघाचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी वक्तव्य देताना सांगितले की, “आम्ही दीपक चहरच्या दुखापतीबद्दल चिंतित आहोत. फिजिओ आणि डॉक्टरांच्या तपासणीनंतर चांगला रिपोर्ट यावा, अशी मला आशा आहे.”

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!