राजकीयराज्य

“बाबा तूच वस्तरा घेऊन ये, आणि..”, मिशी काढण्याच्या टीकेवरुन अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना उत्तर

अजित पवारांना ४ जूननंतर मिशा काढाव्या लागतील असं श्रीनिवास पवार म्हणाले होते त्याला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. लक्षवेधी ठरलेल्या बारामतीतही मतदान होतं आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे. नणंद आणि भावजयीच्या या लढाईकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असंही पाहिलं जातं आहे. दुसरीकडे ४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील असं वक्तव्य श्रीनिवास पवार यांनी केलं होतं. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी श्रीनिवास पवारांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबात सगळ्यात ज्येष्ठ माझे वडील अनंतराव पवार होते. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. आज आम्ही मतदान केलं. महायुतीचा उमेदवार यावा या दृष्टीने प्रचार केला होता. आरोपांचा धुरळा माझ्या विरोधात उठवला आहे. मी मात्र या आरोपांकडे लक्ष दिलेलं नाही. माझ्या शेवटच्या सभेपर्यंत बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. आता अंतिम गोष्टी मतदारांच्या हातात आहेत. आज मतदान होणार आहे. आम्हाला एक विश्वास आहे की बारामतीत केलेलं काम आणि नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत केलेलं काम हे सगळं बारामतीकर लक्षात घेतील. जनतेने मला साथ दिली आहे आताही मला साथ देईल अशी मला खात्री आहे.” असं अजित पवार म्हणाले. तसंच श्रीनिवास पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्यालाही उत्तर दिलं आहे

श्रीनिवास पवारांना अजित पवारांचं उत्तर

श्रीनिवास पवार म्हणाले होते ४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील असं म्हणाले होते. याबाबत विचारलं असता, अजित पवार म्हणाले अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा. असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पवारांना टोला दिला आहे. बारामतीत काटेवाडी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सगळ्या आरोपांना उत्तर दिलं.

आणखी काय म्हणाले अजित पवार?

श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या आहेत असंही वक्तव्य केले होते. याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचे दाखवले. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. माझी आई माझ्याबरोबर आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्याबरोबर आहे. आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!