महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?
मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने अनेक सामने एकट्याच्या जीवावर मुंबईला जिंकून दिले आहेत.
सूर्याने आयपीएल 2024 मध्ये 9 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 334 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 3 अर्धशतक लगावली आहेत.
सूर्यकुमार वर्षभरात कोट्यवधींची कमाई करतो. याशिवाय त्याचा खर्चही बऱ्यापैकी आहे. सूर्याकडे जोंगा कार आहे. रिपोर्टनुसार त्याची किंमत 3 कोटींहून अधिक आहे. सूर्याने जोंगासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलईही आहे. ही पाच सीटर कार आहे. याचे मायलेज 8.2 किलोमीटर प्रति लिटर आहे. जर आपण कारच्या किंमतीबद्दल बोललो तर ही कार सुमारे 2 कोटी रुपये आहे. सूर्यकुमारच्या कमाईबद्दल बोलल्यास तीही कोटींमध्ये आहे. मुंबई इंडियन्स त्याला प्रत्येक मोसमासाठी 8 कोटी रुपये देते.
बीसीसीआयकडूनही त्याला पगार मिळतो. यासह तो अनेक ब्रँड्सच्या माध्यमातून चांगले पैसे कमावतो.सूर्याच्या घराची किंमतही करोडोंमध्ये आहे. त्याचे मुंबईतील चेंबूर येथे एक अपार्टमेंट आहे. त्याची किंमत 8 ते 10 कोटी रुपये आहे.