सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज यंदाच्या मोसमात रेकॉर्डब्रेकिंग खेळी खेळण्यासाठीच जणू मैदानात उतरतात. आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रमही यंदा हैदराबादने मोडला. हैदराबादचे सलामीवील ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा तर तुफान फॉर्मात आहे. पॉवरप्लेमध्ये चेंडू फक्त चौकार-षटकारासाठी धाडायचा, एवढा एकच उद्देश घेऊन हे दोघे मैदानात उतरतात.
पण लखनऊविरूद्धच्या सामन्यात तर या दोघांनीही कमालच केली. १६७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत एकही विकेट न गमावता या दोघांनीही संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ही फलंदाजी पाहून स्वत: सचिन तेंडुलकरही भारावला आहे, त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने लक्ष वेधलं आहे.
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा बातमीपत्र महाराष्ट्राचे