अक्षय्य तृतीयेपासून ९ दिवस ‘या’ ३ राशींवर माता लक्ष्मी करणार धन वर्षाव; तुम्हीही १९ मे पर्यंत सोन्यासम आयुष्य जगाल
हिंदू धर्मानुसार अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांमध्ये अक्षय्य तृतीया तिथीचा सुद्धा समावेश आहे. यादिवशी केलेल्या कामाचे प्रभाव हे अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारे असतात
हिंदू धर्मानुसार अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांमध्ये अक्षय्य तृतीया तिथीचा सुद्धा समावेश आहे. यादिवशी केलेल्या कामाचे प्रभाव हे अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारे असतात असे मानले जाते. तसेच यादिवशी झालेला लाभ हा चिरकाल टिकणारा असतो अशीही मान्यता आहे. यंदा शुक्रवार १० मेला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे. विशेष म्हणजे यंदा १०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला तीन अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत. यापैकी एका हा गुरु चंद्राचा गजकेसरी राजयोग, दुसरा हा शनीचा शश राजयोग व तिसरा अत्यंत लाभदायक असा बुध व शुक्राचा लक्ष्मी नारायण राजयोग असणार आहे. याशिवाय अन्य अनेक लहान मोठे योग सुद्धा विविध राशींमध्ये साकारले जाणार आहेत. या योगायोगामुळे अक्षय्य तृतीयेपासून खरोखरच काही राशींचा सुवर्ण काळ सुरु होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मी या राशींच्या घरी नांदेल अशी स्थिती ग्रहांनी साकारली आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोग हा १९ मे पर्यंत कायम असणार आहे तर शनीच्या पुढील नक्षत्र परिवर्तनापर्यंत शश योग सुद्धा कायम असेल. अशा स्थितीत हा अंदाज लावता येऊ शकतो की प्रभावित राशी केवळ अक्षय्य तृतीयेलाच नव्हे तर पुढील ९ दिवस प्रचंड धनलाभ मिळवू शकणार आहेत. या राशी कोणत्या व त्यांच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..