इव्हेंट मॅनेजमेंट : आपल्याला मॅनेजमेंट विभागाची आवड असेल तर आपण बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा करू शकता. त्यासाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. या कोर्सनंतर ब्रँड मॅनेजिंग, नेटवर्किंग, होस्टिंग, बजेट मॅनेजिंग, मीडिया मॅनेजमेंट, इत्यादी क्षेत्रात आपण करियर करू शकता.
👩🏫 डिजिटल मार्केटिंग कोर्स : दिवसागणिक वाढणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांमुळे डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टची गरज निर्माण होते. हा शॉर्ट टर्म कोर्स केल्यानंतर तुम्हाला एसईओपासून वेब अॅनालिटिक्स आणि अॅफिलिएट मार्केटिंगबाबत विस्तृत माहिती मिळेल.
📸 फोटोग्राफी कोर्स : आपल्याला फोटोग्राफीची विशेष आवड असेल तर त्यातच करियर करायचं असेल तर आपण फोटोग्राफीचा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. या शॉर्ट टर्म कोर्समध्ये आपल्याला कॅमेरा टेक्निक, लायटिंग आणि पोस्ट-प्रोसेसिंगबाबत विस्तृत माहिती मिळेल.