कृषी

शेतकऱ्यांसोबत पावसाची थट्टा; ‘या’ भागांना अवकाळीचा फटका बसणार

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसलाय. फळबागांसह भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळीमुळे ज्वारी, केळी, आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे.

आता अजून काही दिवस अवकाळीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे.

‘या’ ठिकाणी गारांचा पाऊस होणार

येत्या 24 तासामध्ये राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने (Maharashtra Weather) आता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा दिलाय.

आज मध्य महाराष्ट्रात पुणे ,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

कोकणात उष्णतेची लाट येणार

यासोबतच सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच (Maharashtra Weather) काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वातावरणातील खालच्या भागात वाऱ्याची एक चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भ लगतच्या भागावर तयार झाली आहे. तसेच वाऱ्याची एक द्रोणीय रेषा, आग्नेय अरबी समुद्र व केरळच्या लगतच्या भागातून मराठवाड्यापर्यंत जात आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!