Gamesमनोरंजन

२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग

सचिन तेंडुलकरच्या लेकाचा हा अंदाज स्वतः स्टॉइनिसला फार रुचला नाही हे त्याच्या अर्जुनकडे टाकलेल्या संतप्त लुकमधून स्पष्ट होत आहे. या काही सेकंदाच्या घडामोडीवरून ऑनलाईन सुद्धा चर्चा चालू आहे.

वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सचिन तेंडुलकरच्या लेकाला सुद्धा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यंदाच्या हंगामातील अर्जुनचे हे पहिलेच षटक होते. या षटकात मार्कस स्टॉइनिसला धावबाद करण्याचे आव्हान स्वीकारले होते. आक्रमकरित्या गोलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर नेमका स्टॉइनिसच्या पॅडला चेंडू लागला होता पण हा बाद वाटल्याने अर्जुनने जोरदार अपील केली. खरंतर पंचांनी सुद्धा अर्जुनच्या बाजूने निकाल देत स्टॉइनिसला बाद दिले होते पण ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टॉइनिसने मोक्याच्या वेळी रिव्ह्यू घेतला व त्यात तो नाबाद सिद्ध झाला. हे सगळं घडत असताना अनेकदा अर्जुन हा स्टॉइनिसला खुन्नस देताना सुद्धा दिसून आला. सचिन तेंडुलकरच्या लेकाचा हा अंदाज स्वतः स्टॉइनिसला फार रुचला नाही हे त्याच्या अर्जुनकडे टाकलेल्या संतप्त लुकमधून स्पष्ट होत आहे. या काही सेकंदाच्या घडामोडीवरून ऑनलाईन सुद्धा चर्चा चालू आहे.

मुंबईच्या अंतिम साखळी सामन्यासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलेल्या अर्जुनने सामन्याच्या दुस-या षटकात स्टॉइनिसला चार डॉट बॉल टाकले, ज्यात ऑसीसाठी एलबीडब्ल्यू बाद होण्याची भीती होती, तर ओव्हरमध्ये तीन धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर अर्जुनने खुन्नस देताच आधी स्टॉइनिस सुद्धा रागात त्याला ओरडायला गेला पण नंतर मस्करी करत असल्याचे दाखवत त्याने आपला चेहरा मागे वळवला. यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी कदाचित स्टॉइनिसने सचिनचा मान ठेवून अर्जुनवर राग काढणं टाळलं असावं असंही म्हटलं आहे. तर काहींना पहिल्याच सामन्यात अर्जुनने अनुभवी खेळाडूंना खुन्नस देणं पटलेलं नाही, सचिन मैदानात किती शांतपणे खेळायचा त्याची फक्त बॅटच बोलायची पण अर्जुनला हा शांतपणा सवयीचा नसल्याचं दिसतंय असंही काहींनी व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शन व कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

२ चेंडूंवर २ षटकार आणि तेंडुलकरच्या लेकाची माघार

पहिल्या षटकात इतका नाट्यमय खेळल्यावर दुसऱ्या षटकात तरी अर्जुनला हवीहवीशी एखादी विकेट मिळतेय का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण दुसऱ्या षटकात अर्जुनच्या समोर स्वतः निकोलस पुरणचे झंझावाती वादळ होते. पुरणने न बोलताच स्टॉइनिसचा बदला घेत अर्जुनच्या दोन चेंडूंवर दोन जबरदस्त षटकार ठोकले. यानंतर तर अर्जुन तेंडुलकरच्या स्नायूंवर ताण आल्याने त्याला थेट पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अवघ्या २.२ षटकात विकेट मिळवली नसली तरी अर्जुन चर्चेत राहण्यात यशस्वी झाला हे खरं.

दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये अर्जुनचा हा पहिलाच सहभाग होता. त्याने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आणि काही अनुभवी क्रिकेटपटूंना प्रभावित करताना चार सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या होत्या.

 

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!