मनोरंजन

‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर

सोनी सबवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं तो बेपत्ता होऊन महिना होत आला होता.पोलिसांकडून त्याचा एवढ्या दिवस शोध घेण्यात आला. अखेर 25 दिवसांनंतर सोढी घरी परतला आहे

गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईसाठी निघाला होता. पण तो मुंबईत पोहोचलाच नाही. त्यानंतर त्याच्याशी कोणताच संपर्क झाला नाही.चार दिवसांनंतर 26 एप्रिलला त्याच्या कुटुंबाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पालम पोलीस ठाण्यात दिली. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.आता तो घरी परतला आहे. आता एवढ्या दिवस सोढी नेमका कुठे होता, काय करत होता?, असे प्रश्न निर्माण केले जात आहेत. याबाबत स्वतः त्यानेच मोठे खुलासे केले आहेत. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सगळं काही सांगितलं.

गुरुचरण इतक्या दिवस कुठे होता?

गुरुचरण (Gurucharan Singh) म्हणाला की,”मी दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो.बरीच दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला”. असं गुरुचरण सिंग म्हणाला आहे.
बेपत्ता होण्याची तक्रार केली असल्याने पोलिसांनी त्याचा एवढ्या दिवस शोध घेतला. अभिनेत्याने 27 वेगवेगळे ई-मेल अकाऊंट वापरल्याचं दिल्ली पोलिसांना आढळलं आहे.कुणीतरी आपली हेरगिरी करत आहे, असा संशय त्याला होता, त्यामुळे त्याने वारंवार त्याचं ई-मेल खातं बदललं,असा अंदाज पोलिसांनी लावला. पोलिस आता त्याची चौकशी करत आहेत

‘तारक मेहता..’चा होता भाग

या चौकशीदरम्यान समोर आलं की, गुरुचरण (Gurucharan Singh) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच अभिनेत्याला आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागणार आहे. गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारत होता. 2008 ते 2013 पर्यंत तो याचा भाग होता. मात्र, 2020 मध्ये त्याने ही मालिका सोडली.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!