राज्यविशेष बातमी
कौठडी येथील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिंदेसह दोन शिपायांना प्रवरा नदीत वीरमरण……
मुलांच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने राबविण्यात येत होती मोहीम
दौंड ( टीम – बातमीपत्र)
राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) धुळे येथे नेमणुकीस असलेले दौंड तालुक्यातील कौठडी येथील रहिवाशी असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे व त्यांचे २ सहकारी पोलीस शिपाई हे सुगाव बु., (ता. अकोले, जि. आहिल्यानगर) येथे प्रवरा नदीमध्ये दोन मुले बुडाली असता त्यांचा शोध व बचावकार्य करण्यासाठी गेले असता आज दि. २३ रोजी बोट पलटी होवून त्यांना वीरमरण आले असल्याची दुर्दैवी दुःखद घटना घडली असल्याने परिसरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मयत पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे यांच्या पश्चात आई , पत्नी, 2 मुली असा परिवार आहे.
आज संध्याकाळी उशिरा त्यांच्यावर त्यांच्या गावी कौठडी (ता.दौंड)येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.