खानवटे ग्रामस्थांनी केले जलपूजन…..
राजेगाव (टीम – बातमीपत्र)
खानवटे (ता.दौंड) येथील परिसराला भीमा नदी पात्र मोठ्या प्रमाणावर लाभले आहे.त्यामुळे या भागातील शेती ही मुख्यता नदीच्या पाण्यावर अवलंबून आणि येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालक ,मासेमारी आधारित आहेत मात्र यंदा नदी पात्र कोरडे पडल्याने नागरिकांच्या नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. त्यातच नुलतेच आता भीमा नदी पात्रात चांगले पाणी आल्याने या भागातील शेतकरी व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.पावसाळा सुरु होईपर्यत हा पाणीसाठा नक्की पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे
दौंड तालुक्याचे आमदर राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नातून भीमा नदी मध्ये सुरू केलेला विसर्ग आज दौंड तालुक्याच्या शेवटच्या गावी खानवटे मध्ये पोहोचल्याने येथील ग्रामस्थ व शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी जलपून करण्यासाठी मा.सरपंच अशोक गायकवाड व ज्येष्ठ नागरिक रामभाऊ पानसरे यांचे हस्ते करण्यात आले तर उपस्थित खानवटे शरद ढवळे, रामदास धायतोंडे, हनुमंत भोसले, बापु झोंड, कुलदीप झोंड, मयुर शिरसट, भाऊ नामदेव ढवळे, सतीश नवले,चंद्रकांत गाडे, शरद कन्हेरकर, पिंटू भोसले आदी उपस्थित होते यावेळी जल पुजन करताना नागरिकांनी आमदार राहुल कुल यांचे आभार मानले.