दहावीचा निकाल आज होणार जाहीर; कसा आणि कुठे पाहता येणार?
पुणे (टीम – बातमीपत्र)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (दि.२७) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेली होती. अखेर निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिल्याने विद्यार्थांसह पालकांची देखील धाकधूक वाढली आहे.
राज्य मंडळाने २७ मे रोजी निकाल जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. यंदा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे बंधन घालण्यात आल्यामुळेच निकाल लवकर जाहीर होत आहे. १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात परीक्षेसाठी सुमारे १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३.https://sscresult.mahahsscboard.in
४.https://results.digilocker.gov.in
५.https://results.targetpublications.org
कसा पाहाल निकाल?
• महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
• होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
• तुमचे लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचे नाव नोंदवा.
• स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईल.
■ दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.
• निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा प्रिंट आऊट घ्या.