पुणे जिल्हा ग्रामीण

मलठण गावाला मिळणार 24 तास वीज, आमदार राहुल कुल यांच्या सहकार्याने प्रश्न लागला मार्गी…….

मलठण (टीम – बातमीपत्र)

मलठण व परिसराला वारंवार भेडसावणारा विजेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार राहुल कुल यांच्या सहकार्याने मलठण गावाला आता 24 तास थ्री फेज वीज वितरण होणार आहे. त्यामुळे आमदार कुल यांचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून आभार मानण्यात येत आहेत.
सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मलठण गावाला मलठण येथील सब स्टेशन मधून विद्युत पुरवठा करण्याच्या कामाला मिळाला मुहूर्त मिळाला आहे. मलठण गावाला गेली अनेक वर्षापासून विजेच्या अनेक समस्या होत्या, वीज वेळेवर मिळत नाही. दररोज लाईन फॉल्ट हे नित्याचेच ठरलेले. याचा परिणाम अनेक छोट्या मोठ्या व्यवसायधारक तसेच गावातील नागरिकांना सहन‌ करावा लागत होता.
गावात सबस्टेशन होते पण त्याचा विजापुरवठा गावाला नव्हता, गावातील सबस्टेशन चा वीजपुरवठा गावाला व्हावा यासाठी नागरिकांची मागणी वारंवार होत होती. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनही केली परंतु त्याला यश आले नाही. अखेर मलठण ग्रामपंचायतचे सरपंच व पदाधिकारी यांनी आमदार राहुल कुल यांची भेट घेत मलठण गावाला मलठण सबस्टेशनमधून 24 तास थ्री फेज फिडर लवकर चालू करण्याची विनंती केली यावर आमदार कुल यांनी कार्यकारी अभियंता दरवडे यांना सुचना केल्या होत्या. मलठण सबस्टेशन मधून गावाला वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले होते आणि आज दि. 27 रोजी प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली. हे काम मार्गी लावण्यासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी मोलाचे सहकार्य केले आहे असे सरपंच पार्वती परदेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!