पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

रात्रीचे वेळी अचानक दिसणाऱ्या ड्रोन प्रकरणाबाबत पुणे ग्रामीण पोलीस घेणार तांत्रिक विशेषज्ञ यांची मदत …….

पुणे (टीम – बातमीपत्र)
रात्रीचे वेळी अचानक दिसणाऱ्या ड्रोन प्रकरणाबाबत पुणे ग्रामीण पोलीसांकडून तांत्रिक विशेषज्ञ यांची मदत घेण्यात येणार आहे अशी माहीती पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून बारामती, सुपा, यवत, दौंड, भिगवण परीसरात रात्रीचे वेळी अचानक ड्रोन दिसत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे. ड्रोन दिसल्याने विविध अफवा नागरीकांमध्ये पसरल्याने अचानक दिसणारे हे ड्रोन नक्की काय प्रकार आहे ? याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
ड्रोन मुळे निर्माण झालेल्या अफवा तसेच नागरीकांमधील भितीचे वातावरण यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांकडून विशेष तज्ञाची मदत घेतली जाणार आहे.
बारामती, सुपा, वडगाव निंबाळकर, यवत, दौंड, भिगवण परिसरात ड्रोन आढळून आले तर नागरीकांनी पुढील पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा बारामती शहर पो.स्टे ०२११२- २२४३३३, सुपा पो.स्टे ०२११२-२०२०३३, वडगाव निंबाळकर पो.स्टे ०२११२-२७२१३३, दौंड पो.स्टे ०२११७- २६२३३३, यवत पो.स्टे ०२११९-२७४२३३ यावर तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण ०२०- २५६५७१७१, २५६५७१७२ येथे संपर्क करावा.
रात्रीचे वेळी दिसणारे ड्रोन मुळे नागरीकांनी भयभीत होवू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नागरीकांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीसांचे वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!