वरवंड सोसायटीच्या चेअरमनपदी सचिन सातपुते तर व्हाईस चेअरमन पदी नानासो रणधीर……
वरवंड (टीम – बातमीपत्र)
वरवंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सचिन सातपुते व व्हाईस चेअरमन पदी नानासो रणधीर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन एन टी राठोड यांनी काम पाहिले आहे.
वरवंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे २ कोटी ३८ लाख रुपये भाग भांडवल असून मागील दोन वर्षापासून सोसायटीने १२ टक्के लाभांश सभासदांना दिला आहे.
आगामी काळात सभासद व संस्थेच्या दृष्टीने उपयुक्त असे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जाणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन सचिन सातपुते व व्हाईस चेअरमन नानासो रणधीर यांनी सांगितले.
या निवडी प्रसंगी भीमा पाटस कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव बारवकर , भीमा पाटस कारखान्याचे संचालक एम.डी.फरगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर ,भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक गोरख दिवेकर , भाजपाचे नेते तानाजी दिवेकर , बाजार समितीचे संचालक अशोक फरगडे आदी उपस्थित होते.