दौंडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध व्यापारी संघर्ष होणार?
दौंड (टीम – बातमीपत्र )
महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने उद्या दि. ६ जुलै रोजी दौंड शहर बंदची हाक देण्यात आली असून या विरोधात व्यापारी संघटनांनी पोलीस स्टेशनला निवेदन देत आम्ही दुकाने सुरू ठेवणार असून आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी केली आहे .त्यामुळे उद्या दौंड शहरात महाविकास आघाडी विरुद्ध दौंड व्यापारी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने तालुक्यातील सहजपूर नांदूर तसेच भांडगाव मधील कंपन्यांना स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. याच्या निषेधार्थ नांदूर व सहजपूर मध्ये उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दौंड शहर बंद ठेवण्याचे आवाहन महाविकास आघाडी व घटक पक्षांनी पत्रक काढून केले आहे.
या पत्रका विरोधात दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील व दौंड व्यापारी संघाचे अध्यक्ष राजु ओझा यांनी दौंड पोलिसांना पत्र देत या बंदला विरोध करत आमचा या बंदला विरोध असून आम्ही आमची दुकाने बंद सुरू ठेवणार आहोत . यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्यापाऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. तसेच आस्थापना बंद करण्याचा काहींनी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यामुळे उद्या दौंड शहरात मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.