Uncategorized

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध

५६ - नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. २ (टीम बातमीपत्र) –  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि. ३० ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

५६ – नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर ०४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी उद्यापर्यंत (३१ ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!